पावसासाठी गणरायास साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:30 PM2018-09-13T16:30:29+5:302018-09-13T16:30:36+5:30

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी परिसरात गणेशाचे चे वाजतगाजत मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिकठिकाणी व घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले असून पावसासाठी गणरायास साकडे घालण्यात आले.

 Enriched for the rainy season | पावसासाठी गणरायास साकडे

पावसासाठी गणरायास साकडे

Next
ठळक मुद्देघरोघरी देखील उत्सवात गणेशाची स्थापना करण्यात आली. पावसाळा काही दिवसाचा पाहुणा असतांना या परिसरात केवळ एक दिवसच अत्यल्प पाऊस पडला आहे. या मुळे या भागात संपूर्ण दुष्काळांचे सावट निर्माण झाले.


न्यायडोंगरी :
न्यायडोंगरी परिसरात गणेशाचे चे वाजतगाजत मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिकठिकाणी व घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले असून पावसासाठी गणरायास साकडे घालण्यात आले.
न्यायडोंगरी परिसरात सकाळ पासूनच गणेशाची आगमनाची जययत तयारी सुरू होती त्यात वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करण्यात आली आहे चौका चौकात ढोल ताशांच्या गजरात मोठया जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले . घरोघरी देखील उत्सवात गणेशाची स्थापना करण्यात आली. पावसाळा काही दिवसाचा पाहुणा असतांना या परिसरात केवळ एक दिवसच अत्यल्प पाऊस पडला आहे. या मुळे या भागात संपूर्ण दुष्काळांचे सावट निर्माण झाले.पावसाच्या भरोसे पेरले पीक ऊन धरून केवळ पाण्या वाचून माना टाकत आहे डोळ्यासमोर पिके वाया जातांना पाहून डोळ्यातून अश्रूअनावर होत आह.े तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकरी बरोबर गावातील नागरिक पाण्यासाठी हैराण झाले आहे त्यात अनेक ऋतू होऊन गेले. श्रावण महिना संपला, पोळा गेला हे सर्व पावसा विना गेल्याने पावसाची आशा संपली असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आह.े पण गणपतीबाप्पा आता तरी पावसाचे गाºहाणे ऐकतील असा आशावाद नागरिकांना असून सर्वांनी गणेशोत्सवात गणरायास पावसासाठी साकडे घातले.
 

Web Title:  Enriched for the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.