शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अभियंत्याकडे कोट्यवधींची संपत्ती

By admin | Updated: April 9, 2015 00:05 IST

१० पर्यंत कोठडी लॉकरमध्ये २३ तोळे सोने; शहरात प्लॉट्स

नाशिक : ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आले आहे़ यामध्ये पाच लाख ७३ हजार ९६५ रुपये रोख, २३ तोळे सोने, ९१ हजार १२२ रुपये किमतीची चांदीची भांडी तसेच नाशिक शहरातील मोक्याच्या जागी असलेल्या पाच प्लॉटचा समावेश आहे़ दरम्यान, बुधवारी(दि़८) अभियंता दशपुते यांना न्यायालयात हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पाटबंधारेखात्यातील बहुचर्चित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यानंतर या खात्यातील हे दुसरे प्रकरण आहे़पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत २००९-१० मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या चार गावांमधील रस्त्याचे मातीकाम व डांबरीकरण तसेच पुढील पाच वर्षे रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम शासनाचे नोंदणीकृत ठेकेदार तथा तक्रारदाराने घेतलेले होते़ या कामासाठी शासकीय नियमानुसार बँक आॅफ बडोदामध्ये ३३ लाखांची अनामत (बँक गॅरंटी) भरून १५ फेब्रुवारी २०१५ रोजी कामही पूर्ण केले़ त्यामुळे बँकेत भरलेली अनामत रक्कम व रस्त्याच्या देखभालीचे शेवटच्या वर्षाचे बिल मिळावे यासाठी ठेकेदार या योजनेच्या प्रतिनियुक्तीवर आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे गेले होते़लाचखोर अभियंता दशपुते यांनी बँकेतील अनामत तसेच रस्ता दुरुस्ती बिलाच्या रकमेची रिलीज आॅर्डर काढण्यासाठी ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर नंदुरबार व नाशिकच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला़ कॉलेजरोडच्या पाटील लेन, नंबर दोनमधील अंबर सोसायटीत ठेकेदाराकडून एक लाख रुपये घेताना अभियंता दशपुते यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत लाचखोर कार्यकारी अभियंता संजय दशपुते यांची चौकशी करीत होते़ बुधवारी(दि़८) दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ के़ ब्रह्मे यांच्या न्यायालयात हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ पंकज चंद्रकोर यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)