Engineer's Association celebrates Engineer's Day | अभियंता संघटनेतर्फे अभियंता दिन साजरा
अभियंता संघटनेतर्फे अभियंता दिन साजरा

नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या निवृत्त अभियंता संघटनेतर्फेसोमवारी (दि.१६)रोटरी क्लब हॉल येथे ‘अभियंता दिन’ साजरा केला. यावेळी नाशिक शहरात संघटनेचे सुमारे चारशे सभासद मिळून पुलवामा शहीद कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. अरविंद गडाख यांनी अभियंता दिनाविषयी माहिती दिली.
विनोद बाविस्कर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात अशोककुमार जैन यांनी संघटनात्मक बाबींचा व संघटनेतर्फे समाजासाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच गेल्या पंचवीस वर्षापासून चालू असलेल्या पेन्शन लढ्याबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. उल्हास रत्नपारखी, मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्र माचे संचालन प्रवीण कंकरेज यांनी, तर आभार राजेंद्र साळी यांनी मानले.


Web Title:  Engineer's Association celebrates Engineer's Day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.