इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी गुळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 22:43 IST2016-03-16T22:38:59+5:302016-03-16T22:43:43+5:30

इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी गुळवे

Engineer Association Chairman | इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी गुळवे

इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी गुळवे


सिन्नर : नाशिक आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन गुळवे यांची, तर उपाध्यक्षपदी योगेश कासार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आर्किटेक्ट अनुप मोहबन्सी, डॉ. सुनील कुटे, आर्किटेक्ट सुप्रिया पाध्ये यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनची निवडणूक पार
पडली. यावेळी अध्यक्षपदी आर्किटेक्ट सचिन गुळवे यांची, तर उपाध्यक्षपदी योगेश कासार पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सचिव- आर्किटेक्ट चारुदत्त नेरकर, सहसचिव- इंजिनिअर नरेंद्र भुसे, खजिनदार- आर्किटेक्ट अर्पिता भट्ट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सहा जागांसाठी १३ जणांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी असोसिएशनच्या तीनशे सभासदांपैकी ७० जणांनी मतदान केले. त्यात इंजिनिअर अमित अलई, सुनील भोर, समाधान गायकवाड, आर्किटेक्ट किरण राजवाडे, मनोज गुप्ता, अंकित मोहबन्सी यांनी विजय मिळवला.
माजी अध्यक्ष आर्किटेक्ट
चंद्रकांत धामणे, विवेक पाटणकर, दीपक देवरे, बाळासाहेब मगर, विजय सोहणी, अरुण काबरे, प्रदीप काळे, आर. के. सिंग, ज्ञानेश्वर गोडसे, विजय सानप यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा गौरव करण्यात
आला. (वार्ताहर)

Web Title: Engineer Association Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.