शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

यंदा रूसला वरूणराजा : गतवर्षी जुलैअखेर २९८ मिमी पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 17:13 IST

भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. तरीदेखील जोरदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता अत्यंत कमी

ठळक मुद्देपंधरवड्यापासून ६७ मिमी पाऊस

नाशिक : शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जुनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्रीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरूणराजा रूसला असून अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.गेल्या काही दिवसांपासून पावसाची ओढ प्रत्येकाला लागली आहे. मेघ दाटून येत असले, तरी जोरदार सरींचे आकमन होत नसल्याने आता बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच वाढत्या आर्द्रतेमुळे वातावरणातील दमटपणा नागरिकांना घामाघुम करणारा ठरत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत शहरात असेच ढगाळ हवामान कायम राहणार असले तरी पावसाची खूप काही जोरदार हजेरी नसेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी कोकण किनारपट्टीसह मुबंईत जोरदार पाऊस झाला असला तरी शहरात मात्र हलक्या सरींचा वर्षाव झाला. या वीस दिवसांत शहरात केवळ ६७ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडे आहे.गेल्यावर्षी जून कोरडाठाक गेला होता; मात्र जुलैत पावसाने ती कसर भरून काढली होती. ६ जुलै २०१९ रोजी त्या २४ तासांच ७० मिमी इतका उच्चांकी त्यामहिन्यातील पाऊस नोंदविला गेला होता. जुलैअखेर २९८.७८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गोदावरीही खळाळून वाहू लागल्याचे चित्र नाशिककरांनी बघितले होते. यंदा कोरोनामुळे वातावरणातील चैतन्य हरविले असताना दुसरीकडे पावसानेही दडी मारल्याने अधिक चिंता वाढली आहे. यावर्षी निसर्गाकडून फारशी कृपादृष्टी होत नसल्याचे सर्वांचेच मत झाले आहे. जूनपासून अद्याप ४३१ मिमीइतका पाऊस पडला आहे.श्रावणसरींच्या वर्षावाकडे लक्षकाही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या पुर्नआगमनाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहे. श्रावणमासात बरसणाऱ्या मध्यम व दमदार सरींच्या वर्षावाकडे बळीराजासह सर्वच नागरिक लक्ष ठेवून आहे. भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. तरीदेखील जोरदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसweatherहवामान