केंद्र शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. लाभार्थ्यांना उद्योजकता विकासाचे महत्वाचे मुद्दे , उद्योग नोंदणी , प्रकल्प अहवाल , बँक लिंकेजेस , उद्योग धोरण , बॅँकेमार्फत वित्तीय साहाय्य , मार्केटिंग या विषयावर नाशिक येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिराचा समारोप पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. शहर अभियान व्यवस्थापक संदीप अगोने यांनी लाभार्थ्यांना योजनेचे महत्व सांगितले. तसेच लाभार्थ्यांच्या ज्या काही सेवा किंवा उत्पादने असतील तर त्यांचे मार्केटिंग तसेच विविध मोठ्या उद्योग समूहाला लिंकेजेस करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
मनमाडला उद्योजकता प्रशिक्षण शिबीराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:24 IST