ट्रकखाली सापडून मुलाचा अंत
By Admin | Updated: August 7, 2014 01:28 IST2014-08-06T22:44:10+5:302014-08-07T01:28:16+5:30
ट्रकखाली सापडून मुलाचा अंत

ट्रकखाली सापडून मुलाचा अंत
सटाणा : खासगी शिकवणीवरून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी अंत झाला. घटनेमुळे संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला होता. सदरची घटना रात्री आठच्या सुमारास घडली.
मराठा इंग्लिश स्कूलमधील नववीचा विद्यार्थी खुशाल सोनवणे हा शिकवणीला गेला. शिकवणी सुटल्यानंतर तो नागपूर रस्त्याने पायी परतत असताना जेसीबी घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकखाली क्रमांक (एमएच ४१ जी ७१७९) सापडून त्याचा अंत झाला. ही घटना अपंग शाळेसमोर घडली. माहिती मिळताच खुशालच्या नातेवाइकांनी ट्रकची तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला होता. नियंत्रण ठेवण्यासाठी मालेगावहून पोलिसांची तुकडीही पाचारण करण्यात आली.