शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेगावातील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: February 28, 2017 02:03 IST

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शिंदे गावठाण भागातील दोन-तीन मजली इमारतीसह कच्च्या-पक्क्या घरांचे, पत्र्यांच्या दुकानाचे असे २३ अतिक्रमणे सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शिंदे गावठाण भागातील दोन-तीन मजली इमारतीसह कच्च्या-पक्क्या घरांचे, पत्र्यांच्या दुकानाचे असे २३ अतिक्रमणे सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी किरकोळ विरोध केल्याने वाद-विवाद निर्माण झाला होता. अतिक्रमण काढण्यासाठी नाशिकरोड व सिन्नर येथुन महामार्गावरील वाहतुक वळविण्यात आल्याने सर्वांचे चांगलेच हाल झाले.नाशिकरोड-पुणे महामार्ग (नॅशनल हायवे क्र. ५०) चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ २०१४ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर काही भागातील काम अत्यंत प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र नाशिकरोडच्या सिन्नरफाटा, चेहेडी, शिंदे गावठाण भागात भुसंपादन करतांना अनेक घरे, दुकाने जमीनदोस्त करावी लागणार होती. त्यातच काही जणांनी न्यायालयात धाव घेतल्याने सदर प्रश्न भिजत पडला होता. शिंदे गावठाण भागातील २३ जणांना आपली कच्ची-पक्की घरे, दुकाने, पत्र्याचे शेड काढुन घेण्याबाबत अंतिम नोटीस या महिन्यात बजविण्यात आली होती. सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उपजिल्हाधिकारी, भुसंपादन अधिकारी दिपमाला चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसुल विभाग, भूअभिलेख, महावितरण, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी-कर्मचारी व महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या केतक एंटरप्राईजेसचे १५० कामगार यांनी दोन पोकलॅँड मशीन, चार जेसीबी, ट्रक आदिंच्या साह्याने अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर, अतुल झेंडे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिक्रमण काढतांना कुठली दुर्दैवी घटना घडू नये म्हणून त्या भागाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रारंभी घरमालक, दुकानदार आदिंनी विरोध करून अद्याप आम्हाला शासनाकडून सर्व पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र रहिवासी, ग्रामस्थ, दुकानदार यांची समजुत काढुन आॅर्डर प्रमाणे काम करावेच लागणार आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी तुम्हीच तुमचे सामान काढुन घ्या असे स्पष्ट सांगण्यात आले. त्यामुळे काही जणांनी आपले कच्चे-पक्के घर, दुकाने, पत्रे, अ‍ॅँगल आदि साहित्य स्वत:हुन काढण्यास सुरूवात केली. (प्रतिनिधी)