म्हसरूळला पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:09 IST2018-02-26T01:09:44+5:302018-02-26T01:09:44+5:30

महापौरांच्या प्रभागातील म्हसरूळ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पदपथावर विविध वस्तू विक्री करणाºया अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्र मण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पदपथावर अतिक्र मण केले असले तरी याकडे महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

The encroachment of the professionals on the footpath of Mhasrul | म्हसरूळला पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

म्हसरूळला पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

पंचवटी : महापौरांच्या प्रभागातील म्हसरूळ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पदपथावर विविध वस्तू विक्री करणाºया अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्र मण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पदपथावर अतिक्र मण केले असले तरी याकडे महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दिंडोरीरोडने म्हसरूळला जाताना महापालिका शाळेपासून काही अंतरावर मनपाने काही वर्षांपूर्वी पायी जाणाºया नागरिकांसाठी रस्त्याला लागूनच पदपथ तयार केलेला आहे. सध्या या पदपथावर नागरिक कमी आणि व्यावसायिक अधिक असे चित्र दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यालगतच्या पदपथावर व्यावसायिकांनी अतिक्र मण केले असले तरी याकडे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.  नागरिकांसाठी तयार केलेल्या पदपथावर व्यावसायिकांनी ठिय्या मांडल्याने नागरिकांना मुख्य वाहतुकीच्या रस्त्याने मार्गक्र मण करावे लागत आहे. मनपाच्या अतिक्र मण विभागाने तत्काळ परिसरात असलेल्या पदपथावरचे अतिक्र मण हटवून पदपथ नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी म्हसरूळ परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The encroachment of the professionals on the footpath of Mhasrul