पांदण रस्ता-नाल्यांवर अतिक्रमण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:25 PM2021-07-31T22:25:40+5:302021-07-31T22:26:19+5:30

खर्डे : बहुतांश गावांत वाड्या-वस्तीवरील शिवार, पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही ठिकाणी नाले, वहिवाट रस्ता निस्तेनाबूत झाले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्याने शेतमाल विक्रीसाठी पाठवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पांदण रस्ता व नाल्यांवरील अतिक्रमणे काढून मार्ग खुला करावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खर्डे, शेरी, वाखारवाडी, विठेवाडी, भऊर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

Encroachment on paved roads and nallas; Neglect of administration | पांदण रस्ता-नाल्यांवर अतिक्रमण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

पांदण रस्ता-नाल्यांवर अतिक्रमण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देवाखारवाडी येथील नाले व शिवार पांदण रस्त्यांचे अनेक ठिकाणी अस्तित्वच धोक्यात

खर्डे : बहुतांश गावांत वाड्या-वस्तीवरील शिवार, पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही ठिकाणी नाले, वहिवाट रस्ता निस्तेनाबूत झाले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्याने शेतमाल विक्रीसाठी पाठवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पांदण रस्ता व नाल्यांवरील अतिक्रमणे काढून मार्ग खुला करावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खर्डे, शेरी, वाखारवाडी, विठेवाडी, भऊर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

वाखारवाडी येथील नाले व शिवार पांदण रस्त्यांचे अनेक ठिकाणी अस्तित्वच धोक्यात आले आहे. भिलवाड गावापासून उगम झालेल्या साखड व करला या वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नाल्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून घाला घातला आहे. पूर्वीपासून साधारणत: १० ते १५ मीटर रुंदीच्या नाल्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असून, शेतजमीन तयार करून मोठ्या प्रमाणात नाल्यात अतिक्रमण झाल्याने नाले अरुंद झाले आहेत.
भिलवाड ते सौंदाणे महामार्ग मालेगाव रोड साधारण ८ ते ९ किमी अंतराचा नाला आहे. शेतीच्या उपजीविकेसाठी या नाल्याचा चार ते पाच गावांना फायदा होतो. वाखारी, श्रीरामपूर, गुंजाळनगर, खुंटेवाडी, देवळवाडी या गावांना सिंचनासाठी नाल्याचा फायदा होतो. साखड नाला व करला नाल्यावर उजव्या पाटाला दोन गेट आहेत. पाटाच्या पाण्यामुळे जवळपास पाचशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने फायदा होतो.

नाल्याच्या अतिक्रमणामुळे केटिवेअर बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होत नसल्याने उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत असतो. साखड नाला व करला नाला अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयापर्यंत सुनावणी झाली असून, अद्याप कार्यवाही केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. परिसरात शिवार, पांदण रस्त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने दळणवळणाबरोबरच शेतमाल विक्रीसाठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दाखल झाल्या आहेत. याचे निराकरण होत नसल्याने नाराजी पसरली आहे.
ग्रामपंचायत, तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांत कार्यालयात कागदी घोडे नाचवण्यातच शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. नाल्यांची व पांदण रस्त्याची शासनाने मोजणी करून अतिक्रमण काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

(फोटो ३१ खर्डे)
शेरी येथे पांदण रस्त्याअभावी बांधावरून डोक्यावर क्रे‌ट घेऊन जाताना महिला.

Web Title: Encroachment on paved roads and nallas; Neglect of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.