शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महामार्गाच्या समांतर रस्त्यावर अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:02 AM

द्वारका ते फाळके स्मारक या राष्टÑीय महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील हॉटेल व गॅरेजची वाहने तसेच मोठी वाहने उभी राहात असल्याने या रस्त्याचा वाहतुकीसाठी कमी व व्यावसायिकांसाठीच अधिक वापर होत असून, महापालिका, पोलीस यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

इंदिरानगर : द्वारका ते फाळके स्मारक या राष्टÑीय महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील हॉटेल व गॅरेजची वाहने तसेच मोठी वाहने उभी राहात असल्याने या रस्त्याचा वाहतुकीसाठी कमी व व्यावसायिकांसाठीच अधिक वापर होत असून, महापालिका, पोलीस यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  मुंबई महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्यात आला असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते करण्यात आले आहेत. जेणे करून शहरांतर्गत जाणाऱ्या वाहनांनी महामार्गाऐवजी समांतर रस्त्याचा वापर करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवावी. परंतु या समांतर रस्त्याचा ताबा व्यावसायिकांनी घेतला आहे. या मार्गावर सर्वाधिक संख्या हॉटेल व्यावसायिकांची असून, त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक सर्रासपणे समांतर रस्त्यावरच आपली वाहने तासनतास उभी करतात त्यामुळे वाहतुकीस नेहमीच खोळंबा होत असतो.  या रस्त्यावर काही ठिकाणी मोटार गॅरेज दुरुस्तीचे दुकाने असल्यामुळे त्यांनीही आपला व्यवसाय रस्त्यावर मांडला असून, दुरुस्तीसाठी येणारी वाहने समांतर रस्त्यावर उभी करून त्यांची कामे केली जातात. या रस्त्यावरून भाभानगर, दीपालीनगर, सूचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, वासननगर, पाथर्डी फाटा यांसह विविध उपनगरांमध्ये जाण्याचे मार्ग आहेत. परंतु समांतर रस्त्यावरील अतिक्रमणामुळे येथील नागरिकांना महामार्गाचाच वापर करावा लागत आहे. परिणामी रस्ता वाहतूक अधिक धोकादायक झाली असून, महापालिका व पोलीस यंत्रणेने समांतर रस्त्यावरचे अतिक्रमण दूर करून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा