शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

नाशिकमध्ये महामार्गाच्या समांतर रस्त्यावर अतिक्रमणे

By श्याम बागुल | Published: September 10, 2018 6:21 PM

नाशिक : द्वारका ते फाळके स्मारक या राष्टÑीय महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील हॉटेल व गॅरेजची वाहने तसेच मोठी वाहने उभी राहात असल्याने या रस्त्याचा वाहतुकीसाठी कमी व व्यावसायिकांसाठीच अधिक वापर होत असून, महापालिका, पोलीस यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा ...

ठळक मुद्देहॉटेल, गॅरेजचे पार्किंग : यंत्रणेचे दुर्लक्ष दुरुस्तीसाठी येणारी वाहने समांतर रस्त्यावर उभी

नाशिक : द्वारका ते फाळके स्मारक या राष्टÑीय महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील हॉटेल व गॅरेजची वाहने तसेच मोठी वाहने उभी राहात असल्याने या रस्त्याचा वाहतुकीसाठी कमी व व्यावसायिकांसाठीच अधिक वापर होत असून, महापालिका, पोलीस यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्यात आला असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते करण्यात आले आहेत. जेणे करून शहरांतर्गत जाणाऱ्या वाहनांनी महामार्गाऐवजी समांतर रस्त्याचा वापर करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवावी. परंतु या समांतर रस्त्याचा ताबा व्यावसायिकांनी घेतला आहे. या मार्गावर सर्वाधिक संख्या हॉटेल व्यावसायिकांची असून, त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक सर्रासपणे समांतर रस्त्यावरच आपली वाहने तासनतास उभी करतात त्यामुळे वाहतुकीस नेहमीच खोळंबा होत असतो. या रस्त्यावर काही ठिकाणी मोटार गॅरेज दुरुस्तीचे दुकाने असल्यामुळे त्यांनीही आपला व्यवसाय रस्त्यावर मांडला असून, दुरुस्तीसाठी येणारी वाहने समांतर रस्त्यावर उभी करून त्यांची कामे केली जातात. या रस्त्यावरून भाभानगर, दीपालीनगर, सूचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, वासननगर, पाथर्डी फाटा यांसह विविध उपनगरांमध्ये जाण्याचे मार्ग आहेत. परंतु समांतर रस्त्यावरील अतिक्रमणामुळे येथील नागरिकांना महामार्गाचाच वापर करावा लागत आहे. परिणामी रस्ता वाहतूक अधिक धोकादायक झाली असून, महापालिका व पोलीस यंत्रणेने समांतर रस्त्यावरचे अतिक्रमण दूर करून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक