वडाळागाव परिसरात टपऱ्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:12 IST2019-09-23T00:12:15+5:302019-09-23T00:12:33+5:30
वडाळागावातील घरकुल योजना परिसरात वाढत्या टपऱ्यांकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

वडाळागाव परिसरात टपऱ्यांचे अतिक्रमण
इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजना परिसरात वाढत्या टपऱ्यांकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वडाळागावातील शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक अनधिकृत झोपड्यांमुळे रस्ता
रुंदीकरणात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सुमारे दहा वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाच्या व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. अखेर महिनापूर्वी पोलिसांचा फौजफाटा घेऊन शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. महापालिकेच्या वतीने त्यातील आणि परिसरतील लाभार्थ्यांची पाहणी करून आणि कागदपत्रे गोळा करून सोडत पद्धतीने शंभर फुटी रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेत घरकुलांचे वाटप करण्यात आले. घरकुल योजनेच्या दोन इमारतींमध्ये वाहनांसाठी वाहनतळासाठी जागा सोडण्यात आली. काही रहिवासींनी छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी दिवसागणिक टपºया थाटण्यात आल्या आहेत. अनेक टपºया वाढत चालल्याने घरकुल योजनेतील रहिवासी सर्रासपणे रस्त्यावर वाहने लावतात.