गडावरील अतिक्रमणे हटविली
By Admin | Updated: January 13, 2016 22:48 IST2016-01-13T22:34:48+5:302016-01-13T22:48:18+5:30
गडावरील अतिक्रमणे हटविली

गडावरील अतिक्रमणे हटविली
सप्तशृंगगड : येथील चांदणी चौक परिसरातील अतिक्रमणे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटविण्यात आल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला. ‘फर्निक्युलर ट्रॉली’ या प्रकल्पाच्या ठिकाणी दुकाने लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून दहा बाय दहाचे २० ते २५ गाळे या व्यावसायिकांना बांधून दिले. परंतु व्यावसायिकांनी धंद्यासाठी गाड्या पार्किंगसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण करून मोठमोठे शेड बांधले होते. त्यामुळे अतिक्रमण झाले होते. अतिक्रमण केल्याने रहदारीचा मुख्य रस्ता अरुंद झाल्याने येथे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची कोंडी होत होती. त्यामुळे भाविकांना अडचणी निर्माण होत होत्या.
अतिक्रमण काढल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के.आर. केदार, कनिष्ठ अभियंता ए.बी. पगारे, शाखा अभियंता एन.सी.अहेर यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)