महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हातोडा चालविला

By Admin | Updated: February 24, 2015 02:09 IST2015-02-24T02:08:03+5:302015-02-24T02:09:42+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हातोडा चालविला

The Enactment of Encroachment Department of NMC has run the hammer | महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हातोडा चालविला

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हातोडा चालविला

नाशिक : जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका मंदिराच्या पाठीमागे खासगी जागेत उभारलेल्या सहवासनगर झोपडपट्टीच्या अनधिकृत बांधकामांवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हातोडा चालविला. या मोहिमेत पक्के बांधकाम केलेली घरे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.
कालिका मंदिराच्या पाठीमागील बाजूस सहवासनगर नावाची झोपडपट्टी वसलेली होती. सदर झोपडपट्टी अनधिकृत असल्याने ती महापालिकेने हटवावी, यासाठी जागामालक शिरीष साठ्ये यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. सदर याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने संबंधित अनधिकृत बांधकामे येत्या ५ मार्च २०१५ पर्यंत काढून टाकण्याचे महापालिकेला आदेशित केले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळी सहवासनगरमधील अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालविला.
सदर पक्की बांधकामे केलेली असल्याने पथकाला ती हटविण्यासाठी चार तासांचा कालावधी लागला.

Web Title: The Enactment of Encroachment Department of NMC has run the hammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.