Employee punishment; Contractor free | कर्मचाऱ्याला शिक्षा; ठेकेदाराला मोकळीक

कर्मचाऱ्याला शिक्षा; ठेकेदाराला मोकळीक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातून फाईल गहाळ प्रकरणी केलेल्या चौकशीत ठेकेदारानेच फाईल घरी नेल्याचे निष्पन्न झालेले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र ठेकेदाराला मोकळीक देत, ज्या टेबलवरून फाईल गहाळ झाली त्या टेबलवरील अपंग कर्मचाºयाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली आहे.
दिंडोरी तालुक्यातील चौसाळे व सावरपातळी येथील सीमेंट प्लग बंधाऱ्यांच्या फाईलची माहिती घेण्यासाठ दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आले असता, सदरची फाईल गहाळ झाल्याचे समोर आले होते. झिरवाळ यांनी फाईलची मागणी करताच लेखा व वित्त विभागाने माहिती न देता कार्यालयास कुलूप लावून पळ काढला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार झिरवाळ यांनी रात्रभर जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. दुसºया दिवशी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी बैठक घेऊन फाईल गहाळ प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने झिरवाळ यांनी आंदोलन मागे घेतले. फाईल गहाळ प्रकरणी चौकशी केली जात असताना ज्या कर्मचाºयाच्या टेबलवरून फाईल गहाळ झाली त्याला नोटीस बजावून त्याच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात आला होता. तर चौकशीत सदरची फाईल संबंधित सीमेंट प्लग बंधाºयाचे काम करू इच्छिणाºया ठेकेदारानेच पळवून नेल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने सदर ठेकेदारावर मेहेरबानी दाखवित, लेखा वित्त विभागाच्या अपंग कर्मचाºयाच्या दोन वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली आहे.
विशेष म्हणजे आमदार झिरवाळ यांनी फाईल गहाळ प्रकरणी संबंधित कर्मचाºयावर कारवाई न करता, त्यास जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली होती. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. फाईल गहाळ प्रकरणातील संबंधित ठेकेदारांवर यापूर्वीही अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत हे माहीत असूनही प्रशासनाने कर्मचाºयावर कारवाई करून ठेकेदारावर मेहेरनजर दाखविली आहे. असाच प्रकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या कामासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या असतानाही सदर ठेकेदाराची पाठराखण करण्यात आली आहे.

Web Title: Employee punishment; Contractor free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.