जायखेडा पोलीस ठाण्यात राबविला एक कर्मचारी, एक झाड उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:03+5:302021-08-28T04:19:03+5:30
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. येथे कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक ...

जायखेडा पोलीस ठाण्यात राबविला एक कर्मचारी, एक झाड उपक्रम
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. येथे कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक रोपटे देण्यात येऊन, कर्मचाऱ्यांच्या नावे एक झाड लावण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, सुनील पाटील, काळे, वाघ, बोडके, निकम, दिपक भगत, पवार, राजेश साळवे, शरद भगरे, भोये, पवार, शेख, गोटमवाड, घाडगे, वाघेरे, पवार, निकेश कोळी, तुषार मोरे, आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या झाडांच्या पालन पोषणाची व देखभालीची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली असून, या उपक्रमाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे.
कोट..
झाडे जगली तर माणसे जगतील, कारण माणसाला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन पुरविण्याचे काम झाडे करतात. त्यामुळे त्यांना जगविणे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून हा उपक्रम राबविला आहे.
- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जायखेडा
फोटो - २७ जायखेडा १
जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.
270821\27nsk_35_27082021_13.jpg
जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.