विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: June 12, 2017 00:32 IST2017-06-12T00:31:52+5:302017-06-12T00:32:13+5:30
विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : देवळा येथे ग्राहकाची तक्र ार निवारणासाठी गेलेले विद्युत सहाय्यक संतोष सुभाष वंजारी (२९) या विद्युत कर्मचार्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
विद्युत कर्मचारी संतोष सुभाष वंजारी (रा. रनाळा, जिल्हा - . नंदुरबार,) हल्ली मु देवळा सब स्टेशन देवळा हे शहरातील निमगल्ली भागातील जुनी सोनार गल्ली येथे राहणार्या धनंजय कमलाकर खैरनार हया वीज ग्राहकाने विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याने केलेल्या तक्र ारीचे निवारण करण्यासाठी दुरु स्ती साठी गेले असता त्यांच्या हाताचा तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने त्यांना रु ग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.