मुंबई नाका परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:24+5:302021-02-05T05:41:24+5:30
मुंबई नाका पोलीस चौकीचे नूतनीकरणाचे फलक, आकर्षक रंगरंगोटीमुळे हा परिसर आकर्षक असल्याचे दिसत आहे. त्यातच महापालिकेच्या वतीने अनेक भागांत ...

मुंबई नाका परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य
मुंबई नाका पोलीस चौकीचे नूतनीकरणाचे फलक, आकर्षक रंगरंगोटीमुळे हा परिसर आकर्षक असल्याचे दिसत आहे. त्यातच महापालिकेच्या वतीने अनेक भागांत स्वच्छता मोहीम सुरू असून, अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईही केली आहे. मात्र, मुंबई नाका परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसत आहे. मुंबई महामार्ग बस स्थानक येथच असल्याने शेकडो प्रवासी येथून जात असतात, ते येथून जाताना परिसरातील अस्वच्छतेतून पुढे वाटचाल करीत असतात. या भागातील झाडांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. फुलझाडे आणि इतर शोभिवंत झाडांमुळे परिसर चांगले दिसू लागले, पण झाडांची योग्य निगा न राखली गेल्याने ही झाडे सुकू लागली. ठीकठिकाणी पालापाचोळा गोळा करून ठेवलेला असतो. हनुमान मंदिरालगतच्या पुलाजवळ रस्त्याला लागून परिसरातील व्यावसायिक केरकचऱ्याचे ढीग आणून टाकतात. मृत जनावरे नंदिनी नदीपात्रात फेकत असल्याने आणि पुलाखालीच शौचाला बसत असल्याने दुर्गंधी पसरते, तर कालिका जलकुंभच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गॅरेज चालक गॅरेजमधील ऑइलमिश्रित कचरा नंदिनी नदीच्या किनाऱ्यालगत आणून ते जाळून नष्ट करतात.
सध्या स्वच्छ शहर स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. अस्वछता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्यामुळे या निमित्ताने मुंबई नाका परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी हेात आहे.
---
आर फोटोवर ०३ गोविंद- मुंबई नाका परिसरात दुभाजकालगत असलेला कचरा, ०३ गोविंद १- रस्त्याच्या लगत फेकलेला कचरा, ०३ गोविंद २- नासर्डी नदीलगत असलेला टाकण्यात आलेला कचरा.