भगुर बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:28 PM2019-10-08T13:28:30+5:302019-10-08T13:35:25+5:30

काही दिवसांपुर्वीच नव्याने बांधलेल्या भगुर बसस्थानकात ठिकठिकाणी कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच परीसरातील शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले

Empire of trash at the fugitive bus station | भगुर बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य

भगुर बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य

Next
ठळक मुद्देशासनाने एक कोटी खर्च करत भगुर बसस्थानकाचे नुतनीकरणठिकठिकाणी कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरली आहेस्वच्छता ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहे.

नाशिक: काही दिवसांपुर्वीच नव्याने बांधलेल्या भगुर बसस्थानकात ठिकठिकाणी कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच परीसरातील शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून एसटी महामंडळाने लक्ष देऊन कायमस्वरूपी सफाई कामगार ठेवून स्वच्छता ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहे.
    शासनाने एक कोटी खर्च करत भगुर बसस्थानकाचे नुतनीकरण करुन काही दिवसांपुर्वीच या बसस्थानकाचे उद्घाटन झाले. परंतु येथील साफसफाई व पाणीपुरवठा सुविधांकडे कोणाचे लक्ष नसून बसस्थानक आवारात ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे तसेच आवारातील शौचालयातील व बेसिंगमधील नळ चोरीला गेले आहे. त्याचप्रमाणे शौचालयात पाणी उपलब्ध नसल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली असल्यामुळे प्रवासांकडून याचा शुन्य वापर होत आहे. याठिकाणी सफाई कामगार नसल्याने स्वच्छताच होत नसून बस आवारात चारही बाजुने बस वाहकाला बस बाहेर काढताना कसरत करावी लागते. सध्या एकच प्रवेश द्वारातुन वाहतूक होत असल्यामुळे याठिकाणी वाहतुककोंडीचा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था नसल्याकारणाने बसस्थानकांचे वैभव एक महिन्यात लोप पावत चालले आहे. बसस्थानकात सर्वच सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान भगुर बसस्थानकातुन सिन्नर, नाशिक, इगतपुरी तालुक्यातील विविध गाव शहरात दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते तरीही एसटी महामंडळ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे असाच प्रकार सुरू राहिला तर नवीन बसस्थानकानकाचे वैभव लवकर नष्ट होईल अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

       शासनाने नवीन उत्कृष्ट बसस्थानक बांधून दिले असून देखील याठिकाणी महामंडळाकडून प्रवाशांना चांगली उपलब्ध होत नाही. बसस्थानकातुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात त्याना पिण्यासाठी पाणी नाही तसेच शौचालय दुर्गंधीमुळे याठिकाणी उभे राहणेही कठीण आहे. त्यामुळे महामंडळाकडून येथे स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
विजय सोनवणे, प्रवासी
 

Web Title: Empire of trash at the fugitive bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक