व्यापारी-उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:59 IST2020-04-14T23:44:10+5:302020-04-14T23:59:45+5:30

लॉकडाउनमुळे शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी-उद्योजकांनी केलेल्या सूचना शासनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.

Emphasis on solving problems of entrepreneurs and entrepreneurs | व्यापारी-उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यावर भर

चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने आयोजित ई-चर्चासत्रात सहभागी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.

ठळक मुद्देनरहरी झिरवाळ : चेंबर आॅफ कॉमर्सच्या ई-चर्चासत्रात आश्वासन

दिंडोरी : लॉकडाउनमुळे शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी-उद्योजकांनी केलेल्या सूचना शासनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.
संचारबंदीमुळे लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने एकूणच आढावा घेऊन व्यापार, शेती व उद्योगांच्या अडचणी, टाळेबंदी दूर झाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरील उपायांबाबत विचार करण्यासाठी ई-चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे झालेल्या या चर्चासत्रात विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ सहभागी झाले होते.
त्यावेळी झिरवाळ यांनी सांगितले, संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी हा उपक्र म स्तुत्य असून, शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी त्वरित व्हावी यासाठी सूचना दिल्या जातील. यावेळी साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी साखर उद्योगापुढील अडचणी मांडल्या.
चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी संचारबंदीत लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग, तसेच व्यापारी व शेतकऱ्यांना जाणवणाºया अडचणींबाबत झिरवाळ यांना अवगत करत उद्योगांच्या उभारीसाठी विशेष पॅकेजची मागणी केली. चर्चासत्राचे संचालन चेंबरचे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांनी केले. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार मानले.
या चर्चासत्रात अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि खासगी सचिव धनंजय सावळकर, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे विश्वस्त आशिष पेडणेकर, विलास शिरोरे, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचेसह राज्यातील शंभरपेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी यांनी सहभागी होत विविध मागण्या मांडल्या.

Web Title: Emphasis on solving problems of entrepreneurs and entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.