शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ परिसरात कांदा साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:20 IST

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या  गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून  गारपीट, अवकाळी पाऊस  या  संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकराशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.

ठळक मुद्देउत्पादन खर्चदेखील हाताशी येत नसल्याने उत्पादकांनी शोधला पर्याय

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या  गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून  गारपीट, अवकाळी पाऊस  या  संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकराशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.गेल्यावर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने तेव्हा कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे. त्याच भावात गेल्यावर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती. परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर महिन्यापर्यंत ठेवला परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकऱ्याने कांद्याची लागवड केली आहे. या कांदापिकासाठी उधार, उसनवार पैसे आणून उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहेत.यावर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असूनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे. मात्र उत्पादन खर्च  १५०० रुपये एकरी असताना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी  ८०० तेे ११०० बाजारभावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या गोदाकाठ परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.बहुतांश सर्वच गावात कांदा लागवड केली जाते. मागील वर्षी  नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगलाच भाव मिळाला होता व बाजारमध्ये त्याचा तुटवडादेखील निर्माण झाला होता.  सध्या भाव कमी असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहे. गेल्यावर्ष भरात कांदा उत्पादकांना फारसा चांगला भाव मिळालेला नाही.nयावर्षी कांदा पिकास पोषक वातावरण असल्याने शेतकरी वर्गास अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न साधल्याने साठवणुकीच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने तसेच सध्या कांद्यास सरासरी  सातशे  ते हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कायमस्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने अनेक परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठविण्याची तयारी करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीonionकांदा