यंत्रमाग कामगारांची ‘नो स्मोकिं ग डे’

By Admin | Updated: December 26, 2015 00:25 IST2015-12-26T00:20:50+5:302015-12-26T00:25:30+5:30

प्रबोधन फेरीप्रतिज्ञा : बिडी, सिगारेटला हात लावणार नाही

Emergency workers 'no smoking day de' | यंत्रमाग कामगारांची ‘नो स्मोकिं ग डे’

यंत्रमाग कामगारांची ‘नो स्मोकिं ग डे’

मालेगाव : येथील यशवंतराव चव्हाण मालक, कामगार, जॉबर, वारपर सायजर युनियनतर्फे शहरात ‘नो स्मोकिंग डे’ प्रबोधन फेरी काढण्यात आली. फेरीला येथील जुन्या महामार्गावरील सुपर मार्केटपासून सायंकाळी ५ वाजता सुरुवात झाली.
नवीन स्थानक परिसरातून एटीटी विद्यालयाच्या प्रांगणात फेरीचे सभेत रूपांतर झाले. अध्यक्षस्थानी यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. जयदीप निकम होते. दीपप्रज्वलन प्रतिभा महिला मंडळाच्या डॉ. चित्रा नेतारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक बी.पी. भावसार, एटीटीचे अध्यक्ष अलहाज अन्सारी, इम्तियाज खलिल, अलिम फैजी, आतिक शेख आदिंनी मार्गदर्शन केले.
शहरात येत्या ३१ तारखेला कामगारांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘नो स्मोकिंग डे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज येथील एटीटी विद्यालयाच्या मैदानावर येत्या गुरुवारी बिडी, सिगारेटला हात लावणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कामगारांना बिडी-सिगारेट गुटखा बंद करून होणाऱ्या आजारापासून दूर राहा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले. कार्यक्रमास भूषण भोसले, तव्वाब अन्सारी, मुजम्मिल मुकादम, दीपक कदम, दिलीप कापडणीस, जलील मन्सुरी आदिंसह मुकादम, कामगार उपस्थित होते. (प्रतिनिधी)मालेगावी यंत्रमाग कामगारांनी ‘नो स्मोकिंग डे’निमित्त काढलेली फेरी.

Web Title: Emergency workers 'no smoking day de'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.