बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमरजेंसी लँडींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:07 IST2018-01-16T15:07:13+5:302018-01-16T15:07:30+5:30
सटाणा : जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे पोहोचवून परत जात असतांना लष्कराचे हेलिकॉप्टर बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावाजवळ नादुरु स्त झाल्याने हेलिकॉप्टरच्या पायलटला इमर्जेन्सी लँडिंग करावे लागले होते.

बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमरजेंसी लँडींग
सटाणा (नाशिक) : जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे पोहोचवून परत जात असतांना लष्कराचे हेलिकॉप्टर बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावाजवळ नादुरु स्त झाल्याने हेलिकॉप्टरच्या पायलटला इमर्जेन्सी लँडिंग करावे लागले होते. काल सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेतीशिवारामध्ये ही घटना घडल्याने ही घटना परिसरातील शेतकºयांंव्यतिरिक्त कोणाला लक्षात आली नाही.मात्र एका शेतकºयाने हा संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हाट्स अपवर टाकल्याने ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार अजमिर सौंदाणे गावाजवळ पायलट व जवानांनी सदर हेलिकॉप्टर उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. अखेर आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर गावाबाहेर मोकळ्या शिवारात उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरच्या दरवाजाचे नट बोल्ट निखळल्याने हेलिकॉप्टरमधील दोन जवान व एक पायलट यांनी स्वत:च दरवाजाची तात्पुरती दुरु स्ती केली व दरवाजाला दोरीने बांधून पुन्हा उड्डाण केले. यादरम्यान शेतात हेलिकॉप्टर आल्याने परिसरातील शेतकºयांनी, लहान मोठ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.पायलटला हेलिकॉप्टरमधील बिघाड तात्काळ लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.