टायर्सचा अपहार; कंटनेर चालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:35 PM2020-07-31T23:35:29+5:302020-08-01T01:01:08+5:30

चेन्नई (वडदरम) येथून अपोलो कंपनीचे टायर भरून दिंडोरी येथे पोहोचविण्यास निघालेल्या मात्र दिंडोरी येथे टायर्स न पोहचविता १४९ टायर्सचा अपहार करून पळून गेलेल्या कंटनेरचालकास सिन्नर पोलिसांच्या पथकाने ठाणे येथून शिताफीने अटक करत त्याच्याकडून १३ लाख ३१ हजार ३६५ रुपये किमतीचे १४१ टायर्स हस्तगत केले आहे.

Embezzlement of tires; Container driver arrested | टायर्सचा अपहार; कंटनेर चालकास अटक

सिन्नर पोलिसांनी टायर्सचा अपहार करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर मुद्देमालासह पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पडिले, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील व सिन्नर पोलिसांचे पथक.

Next
ठळक मुद्देसिन्नर पोलिसांची कामगिरी : १३ लाख ३१ हजारांचे १४१ टायर्स हस्तगत

सिन्नर : चेन्नई (वडदरम) येथून अपोलो कंपनीचे टायर भरून दिंडोरी येथे पोहोचविण्यास निघालेल्या मात्र दिंडोरी येथे टायर्स न पोहचविता १४९ टायर्सचा अपहार करून पळून गेलेल्या कंटनेरचालकास सिन्नर पोलिसांच्या पथकाने ठाणे येथून शिताफीने अटक करत त्याच्याकडून १३ लाख ३१ हजार ३६५ रुपये किमतीचे १४१ टायर्स हस्तगत केले आहे.
संदीप दगडुबा मुंढे, रा. वागदरवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड असे अटक केलेल्या कंटनेरचालकाचे नाव आहे. सातपूर-अबंड लिंकरोड, चुंचाळे फाटा अंबड येथील ओ. के. लॉजिस्टिक प्रा. लि. या ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक भरत हरचंद मराठे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीतील चालक संदीप मुंढे याने अपोलो कंपनीच्या टायर्सचा अपहार केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. १७) फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कंटेनरचालक संदीप दगडुबा मुंढे यास कंटेनर (क्र. एनएल ०१ एबी ५९४०) मध्ये चेन्नई (वडदरम) येथून टायर भरून दिंडोरी येथे पोहोचविण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र चालक मुंढे याने दि .८ जुलै रोजी कंटेनरला लावलेले जीपीएस बंद केले. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालकाने चालक मुंढे यांच्याशी वारंवार संपर्क करूनदेखील त्याचा मोबाइल बंद असल्याने त्याच्याबाबत व टायरांनी भरलेल्या ठÑक कंटेनरबाबत कसलाही पत्ता लागत नव्हता. रविवारी (दि.१२) सदरचा कंटेनर हा सिन्नर पोलीस ठाणेच्या हदीत साईनाथ ढाबा येथे बेवारस स्थितीत आढळून आला. तसेच कंटेनरच्या मागील दरवाजास लावलेले सील तुटलेले असल्याचे दिसून आल्याने त्यातील टायरची तपासणी केली असता, एकूण १३ लाख ४६ हजार २६२ रुपये किमतीचे अपोलो कंपनीचे १४९ लहान मोठे टायर चोरीस गेलेले आढळून आले. चौकशीअंती चालक मुंढे याचेविरुद्ध टायरांचा अपहार केल्याप्रकरणी (दि.१७) रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाकामी सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक भगवान शिंदे, विनोद टिळे, समाधान बोराडे यांच्या पथकावर जबाबदारी सोपवली.
पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले. मात्र तो गावात व परिसरात मिळून आला नाही. आरोपी सद्य:स्थितीत राहत असलेल्या पत्त्याबाबत गोपनियरीत्या तपास केला असता सदर चालक हा जनतानगर झोपडपट्टी, काशिमिरा, जि. ठाणे येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस पथकास मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने ठाणे येथे जाऊन येथून ताब्यात घेतले.

Web Title: Embezzlement of tires; Container driver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.