शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मित्राच्या खात्यावर पैसे टाकून आशेवाडी ग्रामसेवकाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 1:53 AM

ग्रामपंचायतीकडे शासनाकडून वर्ग होणाऱ्या वित्त आयोगाचा निधी त्याचबरोबर ग्रामनिधीची रक्कम सरपंचाला हाताशी धरून मित्रांच्या नावे धनादेशाद्वारे टाकून आशेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे, लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले आहे. 

ठळक मुद्देशक्कल : जिल्हा परिषदेकडून गुन्हा दाखल करण्याची तयारी

नाशिक : ग्रामपंचायतीकडे शासनाकडून वर्ग होणाऱ्या वित्त आयोगाचा निधी त्याचबरोबर ग्रामनिधीची रक्कम सरपंचाला हाताशी धरून मित्रांच्या नावे धनादेशाद्वारे टाकून आशेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे, लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले आहे. जिल्हा  परिषदेने आता ग्रामसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे सदर ग्रामसेवकाने स्वत: पैसे ताब्यात न घेता ते मित्रांच्या बँक खात्यात जमा करून नंतर काढून घेतल्याची नवीन शक्कल लढविली आहे.   दिलीप मोहिते असे या ग्रामसेवकाचे नाव असून, तो नाशिक शहरातील पंचवटीत राहतो. आशेवाडी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना मोहिते याने हा अपहार केला.ग्रामपंचायतीबरोबर मित्रांचीही फसवणूकnदिलीप मोहिते याने फसवणूक करताना त्याच्या मित्रांचीही फसवणूक केली  आहे. खात्यावर पैसे येणार आहेत, परंतु इन्कम टॅक्समुळे मला ते खात्यावर नको असल्याने तुमच्या खात्यावर पैसे टाकतो, नंतर मला काढून द्या, असे म्हणत मोहिते याने मित्रांच्या बँक खात्यांची माहिती घेतली व परस्पर खात्यावर अपहाराची रक्कम वर्ग करून घेतली. पैसे आल्याचे पाहून मित्रांकडून ते परत घेतले. आता मात्र ही रक्कम ग्रामपंचायतीची असल्याचे समजल्यावर मोहिते यांचे मित्र अडचणीत आले आहेत. nग्रामपंचायतीच्या बँक खात्यातील पैसे त्याने मित्रांच्या खात्यात धनादेशाद्वारे टाकले. नंतर त्यांच्याकडून रोख स्वरूपात काढून घेतले आहेत. या अपहारात सरपंचदेखील सहभागी असून, प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत ३५ लाख रुपये अशा प्रकारे हडपण्यात आले आहेत. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक गैरहजर असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केले असून, ग्रामपंचायतीच्या रकमेच्या अपहार प्रकरणी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली जात आहे. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारी