बेरोजगारी हटवा, वीजपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:23 IST2021-01-11T18:48:43+5:302021-01-12T01:23:47+5:30
सिन्नर: तालुक्यात मोठे उद्योगधंदे येत नाही. रतन इंडिया कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे, त्यातील थर्मल पॉवर प्रकल्पाचे पाच युनिट तत्काळ सुरू करावे. आयटीआय, इंजिनिअर बेरोजगार युवकांना कंपनीत नोकरी मिळावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष कैलास दातीर, शहराध्यक्ष राहुल इनामदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

बेरोजगारी हटवा, वीजपुरवठा सुरळीत करा
ठळक मुद्देसिन्नर : प्रहार संघटनेचे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
तालुक्याला मुबलक वीज मिळावी. बेरोजगारी हटवावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम भागातील पवनऊर्जा प्रकल्पातून तालुक्याला वीजपुरवठा करावा, अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष कैलास दातीर, शहराध्यक्ष राहुल इनामदार, आयटी सेलप्रमुख कमलाकर शेलार, सचिव खंडू सांगळे, मुकुंद खर्जे, कपील कोठूरकर, मधुकर निकम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.