गणेश घाटकर
लोकमत न्यूज नेटवर्क, इगतपुरी: इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणावर आज एक मोठे आंदोलन पाहायला मिळाले. मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे व पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेले हे आंदोलन अचानक तीव्र झाले. संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनाॅलमध्ये उड्या मारल्या. हा प्रकार घडताच जलसंपदा विभागाने तत्काळ कॅनाॅलमधून मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.