शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विधेयकाच्या विरोधात नाशकातही एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:19 IST

केंद्र सरकारने आणलेले नवीन कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत या कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नाशिकमधील विविध सामाजिक, राजकीय व सेवाभावी संस्थांनी गुरुवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत समर्थन देत केंद्र सरकरच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देनाशकातील विविध संघटनांचे आंदोलनजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन

नाशिक : केंद्र सरकारने आणलेले नवीन कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत या कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरीआंदोलनालानाशिकमधील विविध सामाजिक, राजकीय व सेवाभावी संस्थांनी गुरुवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत समर्थन देत केंद्र सरकरच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार बळाचा वापर करून दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय किसानसभा, छावा क्रांतिवीर सेना, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष संघटना, राष्ट्र सेवा दल, प्रहार शेतकरी संघटना, आम आदमी शेतकरी संघटना, छत्रपती युवा सेना आदी विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करीत आंदोलन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पंजाब, हरियाणासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्लीत आंदोलन सुरू केले असून, केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांवर केलेला पाण्याचा मारा व अश्रूधुराचा वापरामुळे शंतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. नाशिकमधूनही या आंदोलनाला समर्थन मिळत असून, गुरुवारी विविध संघनांनी एकत्र येऊन केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद नाशकातही पाहालयाल मिळाले. केंद्र सरकारने लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावरील दडपशाही बंद करावी. शेतकऱ्यांच्या नेतृत्वासोबत बिनशर्त चर्चा करावी. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अन्नथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही अखिल भारतीय किसान सभेचे सुनील मालुसरे, राजू देसले, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, जनआंदोलन राष्ट्रीय समन्वय गटाच्या अनिता पगारे, विजय पाटील, नाना बच्छाव, नितीन मते, अनिल भडांगे, अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, विजय दराडे, नामदेव बोराडे, गणेश कदम, जगन काकडे, समाधान बागुल, देवीदास हजारे, विराज देवांग, तल्हा शेख आदींनी जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकFarmerशेतकरीagitationआंदोलन