शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 21:32 IST

अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशाची संधी देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी (दि.२६) संपली असून, आता प्रवेश घेऊ न शकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश खुले करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदहावीच्या पुरवणी परीक्षार्थींना निकालाची प्रतिक्षा दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशाची संधी देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी (दि.२६) संपली असून, आता प्रवेश घेऊ न शकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश खुले करण्यात आले आहेत.अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, तर दुसºया फेरीत ६ हजार ६४२ आणि तिसऱ्या फेरीत ४ हजार १६१ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विशेष फेरीत ४ हजार १०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आली होती. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या व दुसऱ्या फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालयत निवडले, तर तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत मात्र उपलब्ध पर्यांयापैकी प्रथम पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने दुसºया पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करून घेतल्याचे दिसून आले. त्यामुले पहिल्या दोन फे ºयांनतर अकरावीचा कटआॅफ चांगलाच घसरल्याचे दिसून आले होते. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या फेरीत सुरुवातीला ८० टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यानंतर ६० टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना २४ आॅगस्टपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सोमवार (दि. २६) पासून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची इच्छा असून, त्यासाठी त्यांनी पुरवणी परीक्षाही दिली आहे. मात्र या परीक्षेता निकाल अद्याप जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थी