अकरा हजार मुले करणार समूहगान

By Admin | Updated: December 20, 2015 00:09 IST2015-12-20T00:05:00+5:302015-12-20T00:09:03+5:30

अकरा हजार मुले करणार समूहगान

Eleven thousand children will group | अकरा हजार मुले करणार समूहगान

अकरा हजार मुले करणार समूहगान

नाशिक : झेप संस्था आणि महापालिका शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला दि. २५ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी ११ हजार मुलांचा देशभक्तीपर समूहगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी समूहगानसंबंधी माहिती दिली. गुरुमित बग्गा यांच्या संकल्पनेतून मागील वर्षीही समूहगायनाचा उपक्रम राबविण्यात आला होता. बैठकीला जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, के. के. झोटिंग, रो. नि. गोसावी, वि. वा. निपानेकर, एस. आर. पिंगळे, के. डी. हेमंत, डी. पी. निंबेकर आदि उपस्थित होते.

Web Title: Eleven thousand children will group