शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

व्हेंटिलेटरवर असलेले  15 पैकी 11 रूग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 02:12 IST

शहरात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळणे कठीण असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील रूग्णांना बेड मिळाले, चाैदा जणांना ऑक्सिजनही मिळाला पण दुर्दैवाने हेच जीववर बेतले. ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने धावपळ केली, परंतु व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रूग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देकाळाचा घाला : बेड, ऑक्सिजन मिळाले पण जीव वाचला नाही

नाशिक :  शहरात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळणे कठीण असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील रूग्णांना बेड मिळाले, चाैदा जणांना ऑक्सिजनही मिळाला पण दुर्दैवाने हेच जीववर बेतले. ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने धावपळ केली, परंतु व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रूग्णांचा मृत्यू झाला.नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन हे वर्षभरापासूनच कोविड रूग्णालय म्हणून राखीव ठेवण्यात आले होते. या रूग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे बेड असल्याने नेहमीच वेटिंग असते. महापालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन या रूग्णालयांवर कायम ताण असतो. या दोन्ही रूग्णालयात नाशिकच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील रूग्ण येत असतात.रूग्णालयातील घटनेने कर्मचारी अस्वस्थनाशिक :  गोरगरिबांच्या सेवेसाठी म्हणून नाशिकचे डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय परिचित आहे. सध्या ते महापालिकेचे कोविड रूग्णालय म्हणून परिचित आहे. या रूग्णालयात वर्षभरात गरीब आणि गरजवंत रूग्ण बरे झाले आहेत. डॉक्टर आणि कर्मचारी जोखीम पत्करून काम करीत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या अधून मधून होणाऱ्या दुर्घटना अथवा अप्रिय प्रसंग तक्रारींमुळे चांगल्या कार्यास, लौकिकास गालबोट लागल्याने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.  देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पूर्णत: ठेकेदार कंपनीकडे होती, मात्र, चर्चा महापालिकेच्या दुर्लक्षाविषयी झाल्याने अस्वस्थता पसरली आहे.६३ रुग्ण होेते गंभीर  महापालिकेच्या या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात १५० बेडची क्षमता असताना १५७ रूग्ण दाखल होते. त्यातील १३१ रूग्णांना ऑक्सिजन लावावा लागला होता तर १४ रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. या रूग्णालयात दाखल ६३ रूग्ण गंभीर होते. मात्र, ऑक्सिजन गळतीची दुर्घटना झाल्यानंतर एकच हलकल्लोळ झाला. महापालिकेच्या कर्मचारी आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी बरीच धावपळ करून रूग्ण वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, तरीही २२ जणांचा बळी गेला. यात व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAccidentअपघात