डाव्या कालव्याचे पाणी हत्ती नदी पात्रात

By Admin | Updated: October 12, 2016 21:55 IST2016-10-12T21:43:23+5:302016-10-12T21:55:12+5:30

डाव्या कालव्याचे पाणी हत्ती नदी पात्रात

Elephant in the riverbed of the left canal water | डाव्या कालव्याचे पाणी हत्ती नदी पात्रात

डाव्या कालव्याचे पाणी हत्ती नदी पात्रात

 वटार : किकवारी खुर्द येथे पाठसिंचन सभा; सिंचनसभेला लोकप्रतिनिधीनी फिरवली वटार : बागलाण तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडण्यासाठी बुधवारी दुपारी किकवारी खुर्द येथे सिंचन सभा द्वारकाधिश साखर कारखान्याचे चेरमन शंकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. रखडलेला डाव्या कालव्याचे काम सावंत यांच्या स्वखर्चातून करण्यात आले.
बागलाण तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न मोठा गंभीर झाला असून त्यासाठी केळझर डाव्या कालव्यामधून हत्ती नदी पात्रात पाणी मान्यवरांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यावेळी अभियंतासुभाष कापडणीस, शाखा अभियंता केदा वाघ, सहाय्यक अभियंता राजीव निकुंभ, किकवारीचे सरपंच केदा काकुळते, वटारचे उपसरपंच
पोपट खैरनार, चौंधाण्याचे सरपंच राकेश मोरे, अशोक सोनवणे, अनिल पाटील, बाळू खैरनार आदी उपस्थित होते.
यावेळी जलपुजन शंकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरतील सर्व गावांचे सरपंचानी आवर्जून सिंचन सभेला उपस्थित होते. सर्वानी आपल्या बाजू मांडल्या. पण लोकप्रतिनिधिनी मात्र सिंचन परिषदेकडे पाठ फिरवल्याने शेतकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आठ नंबर चारिचे पाणी हत्ती नदी पात्रात सोडल्याने नदी लगतचे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
गेल्या सात ते आठ वर्षापासून दुष्काळाचे सावट होते, यंदा केळझर धरण पूर्व भरले असून आठ नंबर चारी ही एकसप्रेस करून पुरपाणी हत्ती नदीपत्रात टाकून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पण पाण्याचा राजकारण करू नये असे मत लालचंद सोनवणे यांनी व्यक्त केले.
पुर्व नियोजित सिंचन सभा असूनही लोकप्रतिनिधिनी या सभेला पाठ फिरवल्याने लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला.
या सभेला बागलाण तालुक्यातील सिंचन प्रेमी उपस्थित होते. यामधे कैलास बोरसे, बापू निकम, रामकृष्ण खैरनार, अनिल पाटील, पंढरीनाथ सोनवणे, महारु बीरारी, संजय सोनवणे, हरिभाऊ खैरनार, सुधाकर रौंदळ, अशोक बागुल, सुभाष बागुल, यामधे द्वारकाधीश साखर करखान्याचे
सर्व शेतकीचे कर्मचारी व उसविकास अधिकारी परेश साखरे, शेती अधिकारी मुस्तक पटेल, राजेन्द्र बागुल, प्रवीण सोनवणे, हेमंत खैरनार, हिरामन बेडिस्, महेंद्र देवरे, अक्षय चव्हाण आदि. (वार्ताहर)

Web Title: Elephant in the riverbed of the left canal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.