पाटोदा : परिसरातील ठाणगाव, पिंपरी, विखरणी, कानडी, आडगाव रेपाळ, मुरमी कातरणी व परिसरात मंगळवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास उत्तरा नक्षत्राच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या छतावर वीज कोसळल्याने शाळेच्या भिंतींना तडे गेले. विद्युत उपकरणे व शाळेच्या वायरिंगचे नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांची वाताहत झाली होती. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
ठाणगावी शाळेवर वीज कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:31 IST