वीज शुल्क होणार कमी
By Admin | Updated: January 16, 2015 23:53 IST2015-01-16T23:52:26+5:302015-01-16T23:53:09+5:30
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आश्वासन

वीज शुल्क होणार कमी
नाशिक : राज्यातील विजेचे दर अधिक असून, उद्योजकांना परवडणारे नाहीत. मात्र असे असतानाही त्यावर रेडिमेट उत्तर देणे शक्य नसून, वीज शुल्क (इलेक्ट्रीसिटी ड्युटी) कमी करण्याबाबत शासनाकडे तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वीज दरात सरकारकडून १२ टक्के वीज शुल्क आकारले जात असल्याने उद्योजकांना जादा दराने वीज वापरावी लागते. महावितरणला वीजबिल भरले जात असताना सरकारचा त्यामध्ये वाटा असल्यानेच वीज महाग दरात उपलब्ध करून दिली जात असल्याचा प्रश्न यावेळी उद्योजकांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री देसाई यांनी आपण सरकारकडे या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात महिला उद्योजक, महाराष्ट्र चेंबर, नाशिक सिटीजन फोरम, निमा, सृजन या संस्थांनी पॉवरपॉईट प्रेझेटेशनद्वारे नाशिकच्या विकासाबाबतचे मुद्दे मांडले. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, खासदार हेमंत गोडसे, नरेंद्र गोलिया आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)