शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

वीजमंडळाचा भोंगळ कारभार, मजुराचे वीज बिल ६९ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:52 IST

पिंपळगाव बसवंत : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मजुराला चक्क ६९ हजार रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरण विभागाने ह्यझटकाह्ण दिला आहे. सदर मजुराने वीज बिलाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ते कुटुंब महिनाभरापासून मेणबत्तीच्या उजेडात जीवन जगत आहेत.

ठळक मुद्देमहावितरणचा झटका : महिनाभरापासून कुटुंब अंधारात

पिंपळगाव बसवंत : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मजुराला चक्क ६९ हजार रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरण विभागाने ह्यझटकाह्ण दिला आहे. सदर मजुराने वीज बिलाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ते कुटुंब महिनाभरापासून मेणबत्तीच्या उजेडात जीवन जगत आहेत.महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार थांबत नसून अव्वाच्या सव्वा बिल देण्याचे काम अजूनही सुरू आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाला चक्क ६९ हजारांचे वीज बिल दिल्यामुळे पुन्हा एकदा महावितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोडवरील झोपडपट्टीत संतोष जाधव हे वास्तव्यास असून ते कांद्याच्या खळ्यावर प्रतिदिन २०० रुपये रोजंदारीने काम करतात. त्याच्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वीज बिल आई पार्वतीबाई जाधव यांच्या नावाने असून त्यांच्या घरात एक ट्यूबलाइट, टीव्ही व पंखा या व्यतिरिक्त विजेचे कोणतेच उपकरण ते वापरत नाहीत. असे असताना महावितरण कंपनीने मार्चमध्ये तब्बल ६९ हजारांचे बिल पाठवून त्यांची झोप उडवली आहे. त्यामुळे एवढे बिल आले कसे असा प्रश्न जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला असता वीज बिल भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. थकलेली रक्कम न दिल्याने त्यांच्या घराचा वीजपुरवठा महिनाभरापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जाधव कुटुंब अंधारात असून मेणबत्तीच्या उजेडात ते राहत आहेत. त्यामुळे खंडित केलेले वीज कनेक्शन लवकर जोडून द्यावे व अव्वाच्या सव्वा आकारण्यात आलेले वीज बिल रद्द करून नव्याने योग्य बिलाची आकारणी करावी, अशी मागणी जाधव परिवाराने केली आहे.सदर कुटुंबाला शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी भेट देऊन अव्वाच्या सव्वा आकारण्यात आलेले बिल महावितरण कंपनीने रद्द करावे अन्यथा महावितरणला शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा दिला आहे.पूर्वी दर महिन्याला सहाशे ते सातशे रुपये वीज बिल यायचे पण फेब्रुवारीत अचानक ६२ हजार रुपये बिल आले. ते न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा बंद असतानाही त्या ६२ हजारात सात हजारांची भर टाकून पुन्हा मार्चमध्ये ६९ हजारांचे बिल आले. मागील लॉकडाऊनमुळे अगोदरच उत्पन्न घटले असताना अव्वाच्या सव्वा वीज बिल भरायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.- संतोष जाधव, वीज ग्राहक, पिंपळगावज्या वीज ग्राहकांची तक्रार असेल त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. त्यांच्या तक्रारीचे योग्य निवारण करण्यासाठी सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करुन विभागाकडून त्यांना योग्य न्याय दिला जाईल.- नितीन पगारे, सहायक अभियंता, महावितरण.

टॅग्स :electricityवीजGovernmentसरकार