विद्युत जलपंप देता का कोणी विद्युत जलपंपऽऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:51 IST2018-12-16T17:51:01+5:302018-12-16T17:51:19+5:30
वावीसह ११ गाव पाणीयोजना कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; जलपंप नादुुरुस्त असल्याने बारा दिवसांपासून योजना ठप्पच वावी : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना विद्युत जलपंप नादुुरुस्त झाल्याने सुमारे बारा दिवसांपासून ठप्प आहे.

विद्युत जलपंप देता का कोणी विद्युत जलपंपऽऽऽ
वावीसह ११ गाव पाणीयोजना कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; जलपंप नादुुरुस्त असल्याने बारा दिवसांपासून योजना ठप्पच
वावी : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना विद्युत जलपंप नादुुरुस्त झाल्याने सुमारे बारा दिवसांपासून ठप्प आहे. विद्युत जलपंप खरेदीसाठी पाणीपुरवठा समितीकडे पैसे नसल्याने ‘विद्युत जलपंप देता का कोणी विद्युत जलपंपऽऽ’ असे म्हणण्याची वेळ पाणीपुरवठा समिती व पंचायत समिती प्रशासनावर आली आहे.
वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही विद्युत जलपंप नादुरुस्त झाल्याने गेल्या बारा दिवसांपासून ९ गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. साठवण तलावात पाणी असूनही योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गेल्या बारा दिवसांपासून योजनेतील ग्रामस्थांना कृत्रीम पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
गेल्या सात वर्षांपूर्वी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना राबविली आहे. गोदावरी उजव्या कालव्यावर कोळगावमाळ शिवारात साठवण तलाव करुन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजना सुरु होऊन सुमारे सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. योजना सुरु झाल्यापासून अद्याप या योजनेचे विद्युत जलपंप बदलण्यात आले नाही.