देवपूर विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड
By Admin | Updated: March 26, 2017 23:38 IST2017-03-26T23:38:07+5:302017-03-26T23:38:28+5:30
सिन्नर : तालुक्यातील देवपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दिगंबर बाळासाहेब गडाख यांची, तर उपाध्यक्षपदी विजय रंभाजी दिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली

देवपूर विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड
सिन्नर : तालुक्यातील देवपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक गटाचे दिगंबर बाळासाहेब गडाख यांची, तर उपाध्यक्षपदी विजय रंभाजी दिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली होती. १३ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका जागेसाठी मतदान घेण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी दिगंबर गडाख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदासाठी विजय दिवे यांच्या अर्जावर पुंजा खोले यांनी सूचक, तर रघुनाथ गडाख यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येक एकेक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे अध्यक्षपदी दिगंबर गडाख, तर उपाध्यक्षपदी विजय दिवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी केली. बैठकीस भास्कर घुगे, प्रल्हाद गडाख, माणिक गडाख, गजानन गडाख, दिगंबर आण्णासाहेब गडाख, कैलास गडाख, अलका गडाख उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य विजय गडाख, माजी सभापती चांगदेव गडाख यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नवनाथ गडाख, शरद गडाख, सुकदेव गडाख, अंबादास गडाख, चंद्रभान गडाख, प्रवीण गडाख, सुभाष गडाख यांच्यासह सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)