शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

२५७ जागांसाठी पोटनिवडणूक ५९५ ग्रामपंचायतींच्या जिल्ह्यात निवडणुका

By admin | Updated: March 26, 2015 00:42 IST

२५७ जागांसाठी पोटनिवडणूक ५९५ ग्रामपंचायतींच्या जिल्ह्यात निवडणुका

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने मे ते सप्टेंबर यादरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्णातील ५९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १४९ ग्रामपंचायतींच्या २५७ रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या मंगळवारपासून नामांकन भरण्यात येणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना सोमवार, दि. ३० मार्च रोजी जारी करण्यात येणार असून, ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामांकने स्वीकारली जातील. ८ एप्रिल रोजी छाननी, १० रोजी माघार व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २२ रोजी मतदान घेण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येईल. या निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण भागात राजकीय वातावरण तप्त झाले असून, गेल्या महिन्यातच निवडणूक होऊ पाहणाऱ्या ग्रामपंचायतींच्या वॉर्डरचना पूर्ण करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णातील तेरा तालुक्यांत ५९५ इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यात सर्वाधिक मालेगाव (९९) व त्या खालोखाल (९८) सिन्नर तालुक्यात आहेत. गेल्या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत जात प्रमाणपत्र पडताळणीअभावी अनेक ग्रामपंचायतींना राखीव जागांसाठी उमेदवारच न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांसाठीही याचवेळी निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्ह्णात १४९ ग्रामपंचायतींच्या २५७ जागा रिक्त आहेत. विशेष करून नाशिक वगळता आदिवासी तालुक्यांमध्येच या जागा रिक्त आहेत. चौकट==तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायती (कंसात पोटनिवडणुकीच्या रिक्त जागा)नाशिक- २३ (२४)दिंडोरी- ५२ (३७)इगतपुरी- १ (२३)कळवण- ३० (१२)त्र्यंबकेश्वर- ३ (२२)देवळा- १० (१७)बागलाण- ३८ (७२)पेठ- ० (५)सुरगाणा- ० (२)मालेगाव- ९९ (१२)चांदवड- ५५ (६)नांदगाव- ५९ (९)निफाड- ६२ (११)सिन्नर- ९८ (०)येवला- ६५ (५)