शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सात नगरपरिषदांना निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 8:56 PM

नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच आणखी पाच नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत असून दोन नगरपरिषदांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. या सात नगरपरिषदांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोविडच्या नवीन व्हेरीएंटच्या शक्यतेने या निवडणुका लांबणीवर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात असली तरी मार्च २०२२ अखेर या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यताही चर्चिली जात आहे.

ठळक मुद्देडिसेंबरमध्ये मुदत संपणार : मार्च २०२२ अखेर बिगुल वाजण्याची शक्यता

नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच आणखी पाच नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत असून दोन नगरपरिषदांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. या सात नगरपरिषदांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोविडच्या नवीन व्हेरीएंटच्या शक्यतेने या निवडणुका लांबणीवर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात असली तरी मार्च २०२२ अखेर या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यताही चर्चिली जात आहे.जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा या नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार असून त्यासाठी या पाचही ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे. येत्या ३० नोव्हेंबरला या नगरपंचायतीसाठी अधिसूचना जारी होईल. त्यानंतर १ डिसेंबर २०२१ पासून अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झालेल्या असतानाच यापूर्वी मुदत संपलेल्या चांदवड आणि दिंडोरी आणि येत्या डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या नांदगाव, सिन्नर, सटाणा, मनमाड व येवला या नगरपरिषदांनाही निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. त्यासाठी आतापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या केवळ प्रारुप प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून दिले आहेत. याबाबतचा अहवाल पाठविण्याची मुदत ३० नोव्हेंबर आहे. १ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध होणार असून किमान पंधरा दिवस तरी मतदार याद्या प्रभागनिहाय फोडण्याचे काम चालणार आहे. त्यावर हरकती व सूचना मागवल्यानंतर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. दरम्यान, आरक्षण टाकण्याची प्रक्रिया याच कालावधीत होणार आहे. यासाठी किमान निम्मा फेब्रुवारी महिना संपणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञाकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.मनमाड नगरपरिषदमुदत : २९ डिसेंबर २०२१सदस्यसंख्या : ३१नगराध्यक्ष : शिवसेनानांदगाव नगरपरिषदमुदत : २९ डिसेंबर २०२१सदस्यसंख्या : १७नगराध्यक्ष : शिवसेनासिन्नर नगरपरिषदमुदत : २४ डिसेंबर २०२१सदस्यसंख्या - २८नगराध्यक्ष : शिवसेनाचांदवड नगरपरिषदमुदत : नोव्हेंबर २०२०सदस्यसंख्या : १७नगराध्यक्ष : काँग्रेसदिंडोरी नगरपरिषदमुदत : २९ फेब्रुवारी २०२०सदस्यसंख्या : १७नगराध्यक्ष : राष्ट्रवादीसटाणा नगरपरिषदमुदत : २९ डिसेंबर २०२१सदस्यसंख्या : २१नगराध्यक्ष : शहर विकास आघाडीयेवला नगरपरिषदमुदत : १७ डिसेंबर २०२१सदस्यसंख्या : २४नगराध्यक्ष : भाजपाप्रभागांचा आकार बदलणारगत मागील पंचवार्षिक नगर परिषद निवडणुकीत दोन नगरसेवकांचा प्रभाग होता. त्यामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत जैसे थे परिस्थिती राहणार आहे. मात्र प्रभागाच्या भौगोलिक सीमा काहीअंशी बदलण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अनेक प्रभागांचे आकार कमी-जास्त होण्याची शक्यता असून दोन ते तीन नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे.त्र्यंबक, इगतपुरी नगरपंचायतला वर्षभराचा कालावधीजिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची मुदत १७ डिसेंबर २०२२ तर इगतपुरी नगरपरिषदेची मुदत १६ डिसेंबर २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. याठिकाणी अजून वर्षभराचा कालावधी बाकी आहे; मात्र आतापासूनच या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुकांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांच्या निवडणुकांवरही याठिकाणची राजकीय स्थिती अवलंबून असणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक