भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या निवडीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:40 IST2017-12-17T01:39:36+5:302017-12-17T01:40:18+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

The election of Rahul Gandhi as the President of the Indian National Congress | भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या निवडीचा जल्लोष

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या निवडीचा जल्लोष

ठळक मुद्देकमी वयाचे नेतृत्व लाभलेपेढे वाटून आनंदोत्सव साजरा

नाशिक : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाचे नेतृत्व लाभले असून, राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं सांभाळताच शहरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काँगेस कमिटीमध्ये ‘नवे नेतृत्व, नवा जोश’ असे चित्र पहायला मिळाले. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यामुळे नाशिक शहर व जिल्हाभरातील काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांमध्ये उत्साह संचारला असून, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीत एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, हेमलता पाटील, हनिफ शेख, बबलू खैरे, वसंत ठाकूर, ज्युली डिसूजा आदी उपस्थित होते.

Web Title: The election of Rahul Gandhi as the President of the Indian National Congress