निवडणूक प्रक्रियेस हिरवाकंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:59 IST2019-11-22T23:58:51+5:302019-11-22T23:59:10+5:30
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये बोर्डाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

निवडणूक प्रक्रियेस हिरवाकंदील
देवळाली कॅम्प : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये बोर्डाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
विद्यमान बोर्डाची मुदत दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी संपत असून, तत्पूर्वी नवीन बोर्डाची निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कॅन्टोन्मेंट निवडणूक २००७ कायद्यानुसार अनिवार्य आहे. संरक्षण मंत्रालयाने दि २१, नोव्हेंबर रोजी देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्याधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार मागासवर्गीय तसेच महिला आरक्षणबाबत वॉर्ड निश्चित करणे कामी सोडत काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. देवळालीत सध्या अनुसूचित जातीसाठी दोन वॉर्ड राखीव असून, त्यापैकी एक वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. तर इतर सर्वसाधारण असलेल्या सहा वॉर्डांपैकी दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. कॅन्टोन्मेंट निवडणूक कायद्यातील तरतुदीनुसार महिला आरक्षण फिरते राहणार आल्याने सध्या मागासवर्गीयांसाठी महिला राखीव असलेला वॉर्ड एक हा त्याच वगार्साठी खुला होणार असून, वॉर्ड ५ हा मागासवर्गीय महिलासाठी राखीव होणार आहे.
सर्वसाधारण असलेल्या ६ वॉर्ड पैकी रोटेशननुसार वॉर्ड क्रमांक ४ व ८ हे महिला राखीव असल्याने ते नवीन सोडत आरक्षणातून वगळण्यात येऊन उर्वरित वॉर्ड २ व ७ हे दोन वॉर्ड महिलांसाठी सर्वसाधारण वगार्साठी राखीव होण्याची शक्यता आहे. याबाबतचा सोडत काढण्याचा कार्यक्रम स्थानिक पातळीवर राबविल्याचा संपूर्ण अहवाल संरक्षण मंत्रालयास जाणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत आत सर्वसाधारण महिला आरक्षण, मागासवर्गीय राखीव प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यानंतर संरक्षण मंत्रालय निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.
आरक्षणामुळे बदलणार राजकीय गणितं