शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 8:36 PM

जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२ मतदान केंद्रे संवेदनशील असून, या संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र पोलीस तैनात राहणार आहे

ठळक मुद्देसर्व स्ट्रॉँगरूम हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत ११ मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ३२ संवेदनशील मतदान केंद्रांत संचलन जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे

नाशिक : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (दि.२१) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सीआयएसएफ, आरपीएफ, जीआरपीएफच्या तब्बल ११ तुकड्यांचे जिल्ह्यात १ हजाराहूंन अधिक सशस्त्र पोलीस दाखल झाले आहेत. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे पोलीस दल, गुजरात राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे.जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२ मतदान केंद्रे संवेदनशील असून, या संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र पोलीस तैनात राहणार आहे. तसेच जिल्ह्यात १० स्ट्रॉँगरूम असून, स्ट्रॉँगरूममध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांच्या सीलबंद पेट्या ठेवल्या जाणार असल्याने सर्व स्ट्रॉँगरूमच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५ कंपन्यांकडे सोपविली जाणार आहे. या दलाचे सुमारे पाचशेहून अधिक जवान स्ट्रॉँगरूमवर सशस्त्र खडा पहारा देणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच सर्व स्ट्रॉँगरूम हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आहे.शहराच्या तुलनेत जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या मोठी असून, ११ मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरले आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर मतदानप्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलिसांची कसोटी लागणार आहे. त्यानुसार सिंह यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्ताचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला गेला आहे. यानुसार पोलीस प्रशासन जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मालेगाव, निफाड यांसारख्या संवेदनशील असलेल्या तालुक्यांमधील मतदान केंद्रांवर ‘ड्रोन’द्वारे पोलीस नजर ठेवणार आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब निर्माण करण्यासाठी ग्रामीण पोलीस प्रशासनाने दाखल झालेल्या विविध तुकड्यांच्या जवानांसमवेत ३२ संवेदनशील मतदान केंद्रांत संचलन केले.असा आहे पोलीस बंदोबस्त१ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, १२ उपअधीक्षक, ४३ पोलीस निरीक्षक, ११८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २ हजार ८७४ कर्मचारी, २ हजार ५२६ होमगार्ड, गुजरातचे ८०० होमगार्ड, ५ सीआरपीएफच्या कंपन्या, ३ जीएसआरपीएफच्या कंपन्या, ३ सशस्त्र रेल्वे पोलीस दलाच्या कंपन्या अशा एकूण ११ कंपन्यांचे सुमारे अकराशे सशस्त्र जवान असा मोठा फौजफाटा जिल्ह्यात तैनात राहणार आहे.निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वोपरी प्रयत्नशील आहे. सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, जिल्ह्यात कायदासुव्यवस्था टिकवून रहावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्ताची आखणी केली गेली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नाशिक

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019