अभाविप बैठकीत देवळा तालुका कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 17:32 IST2020-01-20T17:28:38+5:302020-01-20T17:32:04+5:30

मेशी : देवळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक मालेगाव तालुका सहसंयोजक प्रज्ञा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खैरे यांनी सांगितले की एक मिनिटांपूर्वी जोडलेला कार्यकर्ता आणि एक वर्षापूर्वी जोडलेला कार्यकर्ता अभाविप मध्ये समान असतो. त्यानंतर देवळा तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.

Election of Deola taluka executive at Abhayavip meeting | अभाविप बैठकीत देवळा तालुका कार्यकारिणीची निवड

अभाविप बैठकीत देवळा तालुका कार्यकारिणीची निवड

ठळक मुद्देअध्यक्षपदी वैभव केदारे शहर अध्यक्षपदी कुणाल शिरसाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
मेशी : देवळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक मालेगाव तालुका सहसंयोजक प्रज्ञा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खैरे यांनी सांगितले की एक मिनिटांपूर्वी जोडलेला कार्यकर्ता आणि एक वर्षापूर्वी जोडलेला कार्यकर्ता अभाविप मध्ये समान असतो. त्यानंतर देवळा तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्षपदी वैभव केदारे, शहर अध्यक्षपदी कुणाल शिरसाठ याची निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारिणी याप्रमाणे सह अध्यक्षपदी रोहित देवरे, सह शहर मंत्रीपदी हेमंत काळे, प्रसिध्द विभाग प्रमुख रोहित धामणे, विशाल पगारे, संपर्क प्रमुखपदी आकाश बचछाव तर सदस्यपदी अनिकेत शेवाळे, विकी गरूड, मयुर निकम, योगेश सावंत, किरण बोरसे, संदीप सोनवणे, अक्षय परदेशी, प्रशांत गांगुरडे, हितेश पवार आदींची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Election of Deola taluka executive at Abhayavip meeting