शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

नाशकात निवडणूक आचारसंहितेची ऐशी तैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 18:30 IST

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने नाशिक शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे पलक लगोलग हटविले. मात्र शहरातील वेगवेगळ्या शासकीय इमारती आणि सार्वजनिक संस्थांच्या उद्घाटन आणि उपक्रमांच्या कोनशिला ‘जैसे थे’ आहे. ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांची चिन्हे आणि झेंडे अजूनही झळक त असल्याने आदर्श आचारसंहितेची ऐशी तैशी सुरू असून, प्रशासनाकडूनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीला ढील दिली असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनाशकातील शासकीय इमारतींच्या कोनशिला झाकण्याचा विसर शहरात झेंडे, पक्ष चिन्ह आणि नामफलकांतून आचार संहितेचे उल्लंघन

नाशिक : विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे पलक लगोलग हटविले. मात्र शहरातील वेगवेगळ्या शासकीय इमारती आणि सार्वजनिक संस्थांच्या उद्घाटन आणि उपक्रमांच्या कोनशिला ‘जैसे थे’ आहे. ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांची चिन्हे आणि झेंडे अजूनही झळक त असल्याने आदर्श आचारसंहितेची ऐशी तैशी सुरू असून, प्रशासनाकडूनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीला ढील दिली असल्याचे दिसून येत आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी (दि.२१) दुपारपासून लागू झाल्यानंतर नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या  शासकीय जाहिराती आणि फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. परंतु, निवडणूक विभागाने शहरातील दर्शनी भागाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी साधा दृष्टिक्षेपही टाकला नाही. त्यामुळे शहरातील विविध शासकीय विभागाच्या इमारतीवरील कोनशिला,  नगरसेवकाचे नामोल्लेख असलेल्या पाट्या, मुख्यमंत्र्यांचे चिन्ह असलेले झेंडे, विविध उपक्रम लोकार्पणाची कोनशिला, विविद पक्षांचे झेंडे व पक्षचिन्ह,संघटनांचे फलक असे अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने हे फलक काढण्याविषयी आणि संबंधित पक्ष संघटनांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यात शनिवारी (दि.२१) विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील विविध राजकीय पक्षांचे फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. पंरतु ही कारवाई मात्र केवळ देखाव्यापुरतीच ठरली असून, शहरातील विविध ठिकाणी अजूनही वेगवेगळ्या पक्ष व संघटनांचे चिन्ह असलेले फलक खुलेआम झळकत असल्याने आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसत आहेत.

आचारसंहितेचे उलंघन निवडणुकीच्या तोंडावर भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर फलक लावले होते. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौºयामुळे पक्षाचे झेंडे चौकाचौकांत लागले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला समारोप सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांची शहरात फलकबाजी केली होती. यातील दर्शनही भागातील फलक जमा प्रशासनाने काढले असले तरी अनेक ठिकाणच्या कोनशिला अद्यापही खुल्या असल्याने आचारसंहितेचे उलंघन होताना दिसून येत आहे.  

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस