निवडणूक; बागलाणमध्ये अर्ज मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:16 IST2018-05-16T00:16:20+5:302018-05-16T00:16:20+5:30
सटाणा : चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीच्या दिवशी थेट सरपंचपदासाठी दाखल केलेले १९ अर्ज मंजूर झाले, तर सदस्यपदासाठी ७२ अर्ज मंजूर झाले. १६ मेस माघारी असून, त्याच दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल.

निवडणूक; बागलाणमध्ये अर्ज मंजूर
सटाणा : चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीच्या दिवशी थेट सरपंचपदासाठी दाखल केलेले १९ अर्ज मंजूर झाले, तर सदस्यपदासाठी ७२ अर्ज मंजूर झाले. १६ मेस माघारी असून, त्याच दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल. भाक्षी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी दहा जणांनी, तर सदस्यांच्या ११ जागांसाठी ३८ जणांनी अर्ज भरले. केळझर/ततानी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी तीन जणांनी, तर सदस्यांच्या ९ जागांसाठी १३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. केरसाने येथील थेट सरपंचपदासाठी चार जणांनी, तर सदस्यांच्या ११ जागांसाठी १५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. मुळाने ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी २ जणांनी, सदस्यांच्या ९ जागांसाठी ६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.