२१ला सभापतिपदासाठी निवडणूक

By Admin | Updated: October 14, 2015 22:52 IST2015-10-14T22:51:25+5:302015-10-14T22:52:50+5:30

महिला बालकल्याण : महिनाभरानंतर लाभला मुहूर्त

Election for 21st President | २१ला सभापतिपदासाठी निवडणूक

२१ला सभापतिपदासाठी निवडणूक

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी अखेर येत्या बुधवारी (दि.२१) निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असून, प्रक्रियेला तब्बल महिनाभरानंतर मुहूर्त लागला आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची मुदत आॅगस्ट महिन्यात संपल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळामुळे नूतन सदस्यांची नियुक्तिप्रक्रिया लांबली होती. त्यानंतर महापौरांनी सप्टेंबरच्या महासभेत तौलनिक संख्याबळानुसार मनसेच्या रत्नमाला राणे, मेघा साळवे व शीतल भामरे, राष्ट्रवादीच्या रुपाली गावंड आणि शोभा आवारे, शिवसेनेच्या नंदिनी जाधव आणि रिपाइंचे सुनील वाघ, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि भाजपाच्या रंजना भानसी यांची सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर केली. सदस्यांच्या नियुक्तीनंतर महापालिकेच्या नगरसचिव विभागामार्फत लगेचच विभागीय आयुक्तांकडे सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यास विभागीय आयुक्त कार्यालयाकडून विलंब लागला. अखेर विभागीय आयुक्तांनी बुधवारी सभापती-उपसभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून बुधवार, दि. २१ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी, दि. १९ आॅक्टोबरला सकाळी ११ ते १ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, माघारीची प्रक्रिया दि. २१ रोजीच होणार आहे. विभागीय महसूल आयुक्तालयातील उपआयुक्त रावसाहेब भागडे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Election for 21st President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.