महापौरपदासाठी १२ रोजी निवडणूक

By Admin | Updated: September 4, 2014 00:43 IST2014-09-04T00:43:18+5:302014-09-04T00:43:49+5:30

महापौरपदासाठी १२ रोजी निवडणूक

Election on 12th May for the post of Mayor | महापौरपदासाठी १२ रोजी निवडणूक

महापौरपदासाठी १२ रोजी निवडणूक


नाशिक : राजकीय पक्षांचेच नव्हे, तर शहरवासीयांचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या महापौरपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या १२ तारखेला निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरुवारपासूनच उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात होणार आहे. तथापि, त्याआतच वेगाने घडलेल्या घडामोडीत मनसेचे दोन आणि कॉँग्रेसचे दोन नगरसेवक गायब झाल्याने स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. मनसेचे सर्व नगरसेवक रात्री मुंबईकडे रवाना झाले. तेथून ते अज्ञात ठिकाणी रवाना होणार आहेत, तर भाजपा-सेनेत शुक्रवारी चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेदेखील नगरसेवकांची बैठक घेऊन कॉँग्रेस समवेत निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी केली आहे.
महापौरपदाची निवडणूक निकट येताच इच्छुकांनी व्यूहरचना सुरू केली होती. त्यातच मनसेचे दोन आणि कॉँग्रेसचे दोन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. मनसेच्या नगरसेवकांची मंगळवारी सायंकाळी तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीस नीलेश शेलार, शोभा शिंदे, सतीश सोनवणे, तसेच सुजाता डेरे गैरहजर होते. पैकी सोनवणे आणि डेरे नाशिकमध्येच होते. शेलार आणि शिंदे बाहेर गावी असल्याचे सांगण्यात आले. मनसेचे नगरसेवक फोडण्यास प्रारंभ झाल्यानंतर प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक घेतली आणि फाटाफूट टाळण्यासाठी बुधवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले.

Web Title: Election on 12th May for the post of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.