विजेच्या धक्क्याने आठवर्षीय मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 16:39 IST2021-06-24T16:38:23+5:302021-06-24T16:39:19+5:30
नांदूरवैद्य : रस्त्यावरील हॉटेलवर पिण्यासाठी थांबलेल्या परिवारातील सायली किरण थोरात (वय ८, रा. कळवा, ठाणे) या बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गुरुवारी (दि. २४) १२ वाजेच्या सुमारास घडली.

विजेच्या धक्क्याने आठवर्षीय मुलीचा मृत्यू
नांदूरवैद्य : रस्त्यावरील हॉटेलवर पिण्यासाठी थांबलेल्या परिवारातील सायली किरण थोरात (वय ८, रा. कळवा, ठाणे) या बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गुरुवारी (दि. २४) १२ वाजेच्या सुमारास घडली.
सदर बालिकेला गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान सदर बालिकेचा मृत्यू झाला. कळवा येथील किरण थोरात हे पत्नी पुष्पा आणि इतर ५ लोकांसह विवाह सोहळ्यासाठी इगतपुरी तालुक्यात आले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला येथे सर्वजण चहा पिण्यासाठी थांबले असतांना यावेळी सायली किरण थोरात ही आठवर्षीय बालिका एका विजेच्या खांबाजवळ गेली. खांबामध्ये वीजप्रवाह असल्याने तिला विजेचा तीव्र धक्का बसला. ती ओरडल्याने सर्वांचे लक्ष गेले. माजी उपसरपंच कमलाकर नाठे यांनी तातडीने नरेंद्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे वाहक निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सायली थोरात हिला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना बालिकेची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.