दिंडोरीत दोन दिवसात आठ रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:13 IST2020-08-21T23:25:12+5:302020-08-22T01:13:56+5:30
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. शहरात दोन दिवसात आठ रु ग्ण वाढले आहे.

दिंडोरीत दोन दिवसात आठ रु ग्ण
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. शहरात दोन दिवसात आठ रु ग्ण वाढले आहे.
बुधवारी पालखेड एमआयडीसी-तील एक कंपनीतील सहा कामगार बाधित आढळले. शहरातील मुरकुटे गल्ली, शिवाजीनगर येथील तीन जणांचा समावेश होता तर पिंपळगाव केतकी येथील अंबड कंपनीतील एक कामगार व शहरातील जाधव गल्लीत एक जण बाधित आढळला. नागरिकांनी काळजी घेत शासनाने दिलेल्या दिशा निर्देश नियमांचे पालन करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे. गुरु वारी ८ जण बाधित आढळले. त्यात वरखेडा, नवे धागुर येथे प्रत्येकी एक, जवळके दिंडोरी ३ तर शहरात वक्र तुंड नगर येथे अवनखेड येथील एक कंपनीतील एक कामगार व जानकी संकुल मध्ये दोन रु ग्ण आढळले. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.